Raigad Lok Sabha Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यात एक जागा, सुनील तटकरेंनी 'रायगड' राखला

Maharashtra Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 48 मतदारसंघाचे काही निकाल आता स्पष्ट होत आहे. रायगडची जागा राखण्यास अजित पवार गटाला यश आले आहे. 

Updated: Jun 4, 2024, 05:17 PM IST
Raigad Lok Sabha Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यात एक जागा, सुनील तटकरेंनी 'रायगड' राखला title=
raigad Lok Sabha Election mahayuti vs maha vikas aghadi ncp sunil tatkare win

Raigad Lok Sabha Election :रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत. सुनील तटकरे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. तर, शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते हे पिछाडीवर आहेत. सुनील तटकरे 508352 मतांनी विजयी झाले आहे. तर, अनंत गीते यांना 425568 मतांवर समाधानी मानावे लागले आहे. 

रायगड मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर, रायगडची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे होती. ठाकरे गटाने अनंत गीते यांना उमेदवारी दिली होती. रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे खासदार आहेत. 

सुनील तटकरे हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. तसंच, रायगड मतदारसंघावर त्यांची सुरुवातीपासून चांगली पकड होती. मतदारसंघात त्यांचा जनसंपर्कदेखील तगडा होता. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गटाकडे सहानुभूती होती. त्यामुळं याचा फटका तटकरेंना बसण्याची  शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळं या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या अटीतटीच्या लढतीत तटकरेंनी विजय मिळवला आहे. 

सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही ही वस्तुस्थिती मान्य आहे. महविकास आघाडीने ज्या पद्धतीने ग्राम पातळीवर कार्यकर्त्यांची फळी अगदी सुरवातीपासून तयार केली. दुर्दैवाने तशी फळी तयार करण्यात आम्ही अपयशी ठरलो.यावेळी झालेल्या चुका आम्ही सुधारू. राष्ट्रवादी काँगेसने यावेळी 4 जागा लढवल्या त्यातील एकच जिंकलो. हे अपयश का मिळालं याचं आम्ही आत्मपरीक्षण करू, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.