रायगड : मुंबई - गोवा महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळत आहेत. दिवाळीच्या सुटीमुळे चाकरमानी आणि पर्यटक कोकणच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेगही कमी झाला आहे. त्यामुळे महामार्गावर प्रचंड मोठी रांग दिसून येत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास रडतकढत सुरु आहे.
दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. काही ठिकाणी अर्धवट स्थितीत दिसत आहे. तसेच त्यातच रस्त्यावरील खड्डे आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे कोंडीत भर पडत आहे. रायगडमधील पेण ते वडखळ दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. या सहा किलोमीटर्सच्या अंतरासाठी ३ ते ४ तास वेळ जात आहे. त्यामुळे चालकही त्रस्त आहेत.