डोंबिवलीत पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन

पुणेरी पाट्यांचं डोंबिवलीत प्रदर्शन

Updated: Jan 30, 2019, 05:42 PM IST
डोंबिवलीत पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन title=

डोंबिवली : गिरगाव, पुण्यानंतर उल्लेख होतो तो डोंबिवलीचा. डोंबिवलीकरांना अधिक समृद्ध करण्यासाठी आता पुणेकरांची मदत होते आहे. पुणेरी पाट्या पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरत नसेल. पुण्यात हे अगदी सहज आहे. अनोख्या पाट्या तुम्हाला पुण्यात ठिकठिकाणी पहायला मिळतील. समाजमाध्यमांच्या प्रवाहात या पाट्यांना आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळेच की काय मराठी वस्ती असलेल्या डोंबिवलीत या पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ड

आयोजकांचा प्रदर्शनाचा उद्देश चा़ंगला असला, तरी डोंबिवलीत आता अशा पाट्या दिसतील की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. पुण्याखालोखाल सांस्कृतिक राजधानी असलेल्या डोंबिवलीने पुणेकरांचा हा गुण घेतात का हे पाहावं लागेल.