गणेशोत्सावाआधी ही पुणेरी पाटी होतेय व्हायरल

पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात.

Updated: Jul 18, 2017, 03:04 PM IST

पुणे : पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ही पुणेरी पाटी गणेशोत्सव मंडळांसाठी आहे. गणपतीची वर्गणीसाठी आलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यामुळे आता वर्गणी मागण्याआधी या पाटीवर लिहिलेल्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.

https://lh3.googleusercontent.com/-K0LkVPoYusw/WW3D669LJdI/AAAAAAAAWRI/nk-Oc5-tIYYzySNxiRwsRNWy_WF3CHEGQCL0BGAYYCw/h720/854d4a92-5123-4438-a6ae-898db103cc2b.jpg