पीएमपीएलची इलेक्ट्रिक बस आली आणि लक्ष्मी प्रसन्न झाली

पीएमपीएलची इलेक्ट्रिक बस आली आणि लक्ष्मी प्रसन्न झाली. असं चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळतं आहे. पीएमपीएलच्या बसेस म्हणजे नको रे बाबा, अशी भावना होती, पण ती आता बदलली आहे. 

Updated: Jun 21, 2019, 08:43 PM IST
पीएमपीएलची इलेक्ट्रिक बस आली आणि लक्ष्मी प्रसन्न झाली title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पीएमपीएलची इलेक्ट्रिक बस आली आणि लक्ष्मी प्रसन्न झाली. असं चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळतं आहे. पीएमपीएलच्या बसेस म्हणजे नको रे बाबा, अशी भावना होती, पण ती आता बदलली आहे. 

पुण्याच्या रस्त्यार धावणाऱ्या या एकदम झक्कास इलेक्र्टिक बस. आतापर्यंत धूर ओकणाऱ्या, खिळखिळ्या झालेल्या पीएमपीएलच्या बसेस असं अत्यंत निराशाजनक चित्र या बसेसनी पुरतं बदलून टाकलंय. या बस वातानुकुलित आहेत. त्या जराही धूर सोडत नाहीत, की आवाज करत नाहीत. सगळा प्रवास कसा थंडा थंडा... कूल कूल... झाला आहे.

इलेक्ट्रीक बसमुळे तब्बल 408 टनांनी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे जवळपास अडीच हजार झाडं वाचली आहेत. बॅटरीवर चालत असल्यानं इंधनाचा आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च अगदी कमी आहे.

आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकीट. तर तिकीट हे पीएमपीएलच्या इतर बसेस एवढंच आहे. सहाजिकच अशाच बसेस सगळीकडे आणा, अशी पुणेकरांची मागणी आहे. पुणेकरांसाठी गुड न्यूज, ती म्हणजे लवकरच अशा आणखी पाचशे इलेक्ट्रीक बस पीएमपीएलच्या ताफ्यात दाखल होत आहे.