तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी

या प्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जाणार आहे. 

Updated: Sep 15, 2017, 08:41 PM IST
 तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी title=

पुणे : कार्यक्षम अधिकारी असा नाव लौकिक असलेले अधिकारी, तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष  तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. 

तुकाराम मुंढे यांनी नेहमीच रास्त भूमिका घेतल्याने त्याचा प्रत्येक ठिकाणी विरोध होत असताना दिसतो, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम असतात, पुण्याआधी नवी मुंबईतही तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेविरोधात राजकारणी अस्वस्थ होते.

या प्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जाणार आहे.