शिरुरमध्ये बिबट्याची दहशत संपेना, गावकऱ्यांचा जीव मुठीत

 बिबट्याने आज पहाटे चांडोह गावातील राजेंद्र पानमंद या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती हल्ला करत 3 शेळ्या ठार मारल्या 

Updated: Jul 5, 2019, 10:18 AM IST
शिरुरमध्ये बिबट्याची दहशत संपेना, गावकऱ्यांचा जीव मुठीत  title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे  :  बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार झाल्याची घटना शिरुरमध्ये घडली आहे. त्यामुळे लोकवस्तीत फिरणाऱ्या बिबट्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बिबट्याबद्दलच्या तक्रारी नागरीक करत आहेत. वनविभागाला यासदंर्भात माहीती देण्यात आली आहे. पण बिबट्याला पकडण्यात अद्याप यश आले नाही आहे. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.  

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत काही संपण्याचं नाव घेत नाही. बिबट्याने आज पहाटे चांडोह गावातील राजेंद्र पानमंद या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती हल्ला करत 3 शेळ्या ठार मारल्या आहेत. त्यामुळे बिबट्यामुळे नागरीक भयभीत झाले आहेत. गावकरी बिबट्याच्या दहशतीच्या सावटाखाली आपला जीव मुठीत धरून जगत आहेत.

त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.