...ही शॉर्टफिल्म जिंकतेय पुणेकरांची मनं!

पीएमपीएल ड्रायव्हरच्या मानसिकतेवर शॉर्ट फिल्म बनवण्यात आलीय. ड्रायव्हरची बसबरोबर निर्माण झालेली जवळीक या शॉर्ट फिल्ममधून दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या जनतेच्या मानसिकतेवर मार्मिक टिप्पणी करण्यात आली आहे. पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनीदेखील या शॉर्ट फिल्मचं कौतुक केलंय. 

Updated: Aug 11, 2017, 11:39 PM IST
...ही शॉर्टफिल्म जिंकतेय पुणेकरांची मनं! title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पीएमपीएल ड्रायव्हरच्या मानसिकतेवर शॉर्ट फिल्म बनवण्यात आलीय. ड्रायव्हरची बसबरोबर निर्माण झालेली जवळीक या शॉर्ट फिल्ममधून दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या जनतेच्या मानसिकतेवर मार्मिक टिप्पणी करण्यात आली आहे. पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनीदेखील या शॉर्ट फिल्मचं कौतुक केलंय. 

शांताराम सावंत... पीएमपीएलचा एक सामान्य ड्रायव्हर... रिटायर्मेंटच्या शेवटच्या दिवशी पीएमपीएलची बस घेऊन गायब होतो. त्यावरून शांताराम सावंतवर टीका सुरु होते. या टीकेला शांताराम सावंत यांनी दिलेलं उत्तर म्हणजे या शॉर्ट फिल्मचा सार आहे. 

बस घेऊन गायब झालेल्या शांताराम सावंत यांच्यावर माथेफिरू अशी टीका होते. पण रिटायर होणाऱ्या शांताराम सावंतचं या बसवर प्रेम असतं. बसला लोकांची संपत्ती म्हणतात. पण, दंगली असोत की कुठलंही आंदोलन असो, लक्ष केलं जातं ते सरकारी बसला. प्रवासी देखील बस मधील सीट कव्हर फाडतात.. बसमध्ये नावं लिहतात... महिला, अपंगांच्या राखीव जागांवर बसतात. हे वास्तव पुढं आणत माथेफिरू कोण? असा सवाल शांताराम सावंत करतो. 

तुकाराम मुंडे यांनीदेखील आवर्जून ही शॉर्ट फिल्म पहिली आणि तिचं कौतुकही केलं. या शॉर्ट फिल्म मुळे पब्लिक ट्रान्सपोर्टकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असं त्यांनी म्हटलंय. सर्वांनी पाहावी अशी ही शॉर्ट फिल्म आहे. स्वतःच्या वाहनाची आपण जशी काळजी घेतो तशीच काळजी पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वाहनांची घेतली तर या शॉर्ट फिल्मचा उद्देश सफल होईल.