पुण्यात उच्चशिक्षित कुटुंबियांचा सुनेवर कौमार्यभंगाचा ठपका, महिलेची पोलिसात धाव

उच्चशिक्षित पतीबरोबर महिला अमेरिकेत गेली पण... काय आहे नेमकं प्रकरण वाचा

Updated: Jan 21, 2022, 02:52 PM IST
पुण्यात उच्चशिक्षित कुटुंबियांचा सुनेवर कौमार्यभंगाचा ठपका, महिलेची पोलिसात धाव title=

पुणे : उच्चशिक्षित कुटुंबीयांनी सुनेवर कौमार्यभंगाचा ठपका ठेवून तिचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी महिला उच्चशिक्षित असून तिचा पतीही उच्च शिक्षित आहे. तो एक सॉफ्टवेअर अभियंता असून एका नामांकित कंपनीत कार्यरत आहे. अमेरिकेतील टेक्सास इथं त्यांचं वास्तव्य आहे.

काही दिवसांपूर्वी तिचं लग्न झालं. लग्नानंतर महिला पतीसोबत अमेरिकेत गेली. तिथे पती तिला लग्नाच्या आधी कोणासोबत शारीरिक संबंध होते का? अशी विचारणा करून सासरच्यांकडून वारंवार छळ करण्यात आला. 

इतकंच नाही तर महिलेला मारहाण करून घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या सगळ्या सतत होणाऱ्या त्रास आणि भांडणामुळे काही दिवसांपूर्वी ही महिला पुन्हा एकदा भारतात आली. सध्या ती पुण्यातील फुरसुंगी इथे राहते, पण इथेही तिच्यावर घटस्फोटासाठी दबाव टाकण्यात येत होता. 

या प्रकारानंतर महिलेने पुण्यात हडपसर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अमेरिकेत राहणाऱ्या पतीसह सासू आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.