अजित पवारांच्या फार्म हाऊसला आग

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुळशी तालुक्यातील घोटावडे येथे असलेल्या फार्म हाऊसला मोठी आग लागली आहे. 

Updated: Aug 11, 2019, 10:33 PM IST
अजित पवारांच्या फार्म हाऊसला आग title=

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुळशी तालुक्यातील घोटावडे येथे असलेल्या फार्म हाऊसला मोठी आग लागली आहे. रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही आग लागली. या आगीच्या ज्वाळा आणि धूर जवळपास एक ते दोन किलोमीटर लांबपर्यंत दिसत होता. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं सांगण्यात येत असलं, तरी आग लागण्याचं कारण अजून समजू शकलेलं नाही.

हिंजवडी आयटी पार्कच्या जवळ घोटावडे ते मुलखेड रस्त्यावर मुळा नदीच्या काढी अजित पवार यांचं हे फार्म हाऊस बांधण्यात आलं होतं. या फार्म हाऊसमधल्या काही जागेचा वाद काही दिवस न्यायालयातही सुरू होता.

आग लागली तेव्हा फार्म हाऊसच्या आतमध्ये कोणीही नव्हतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग विझवण्यासाठी हिंजवडी आयटी पार्कमधून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पाठवण्यात आल्या होत्या.