मुंबईतल्या आगीनंतर पुणे महापालिकेचे फायर ऑडिटचे आदेश

मुंबईतल्या कमला मिलच्या रेस्टॉंरन्टमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती.

Updated: Jan 7, 2018, 06:51 PM IST
मुंबईतल्या आगीनंतर पुणे महापालिकेचे फायर ऑडिटचे आदेश  title=

पुणे : मुंबईतल्या कमला मिलच्या रेस्टॉंरन्टमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पुणे शहारातील सर्व प्रकारच्या निवासी तसेच व्यावसायीक इमारती, आस्थापना, हॉटेल्स, रेस्टॉंरन्ट्स, हॉस्पीटल्स, शाळा- कॉलेजेस, बेकरी अशा सगळ्यांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी अग्निशामक विभागाला दिले आहेत. त्यानुसार अग्निशमन अधिका-यांची पथकं या कामासाठी नियुक्त करण्यात आली आहेत.

सर्व ठिकाणी आग प्रतिबंधक यंत्रणा अस्तित्वात आहे किंवा नाही, आगीची घटना घडल्यास संभाव्य हानी टाळण्यासाठीच्या उपाययोजना अस्तीत्वात आहेत का? अशा सर्व गोष्टींची तपासणी या मोहीमेत करण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी नियमांचं पालन होत नसल्याचं आढळून आल्यास संबंधित व्यवस्थापनाला जागेवरच नोटीस बजावण्यात येत आहे. फायर ऑडिटचा सविस्तर अहवाल १५ जानेवारी पर्यंत आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.