कर्जरोख्यांमुळे पहिल्याच दिवशी पुणे महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटी

पुणे महापालिकेने २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे आणले आहेत.

Updated: Jun 21, 2017, 10:33 PM IST
कर्जरोख्यांमुळे पहिल्याच दिवशी पुणे महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटी title=

पुणे : पुणे महापालिकेने २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे आणले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद लाभतोय. त्याची नोंदणी करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे उद्या मुंबई शेअर बाजारात विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय.

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पुणे महापालिकेसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. शेअर बाजारात सोमवारी लावण्यात आलेल्या ऑनलाईन बोलीमध्ये या कर्जरोख्यांना २१ गुंतवणूकदारांनी मागणी नोंदवलीय. त्यापैकी ७.५९ टक्के असा सर्वात कमी व्याजदर आकारणा-या कंपनीनं पुढच्या १० वर्षांसाठी हे कर्जरोखे खरेदी केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत पहिल्याच दिवशी दोनशे कोटींची भर पडलीय.