वीजबिल थकवणाऱ्या पुणेकरांना दणका

पुण्यातील वीजबिल थकबाकीदारांची बत्ती गुल झालीय. गेल्या पाच दिवसांत सुमारे ५२ हजार ग्राहकांची वीज तोडण्यात आलीय. 

Updated: Nov 14, 2017, 09:45 PM IST
वीजबिल थकवणाऱ्या पुणेकरांना दणका  title=

पुणे : पुण्यातील वीजबिल थकबाकीदारांची बत्ती गुल झालीय. गेल्या पाच दिवसांत सुमारे ५२ हजार ग्राहकांची वीज तोडण्यात आलीय. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबवण्यात येतेय. त्यानुसार पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यात कारवाई सुरु आहे.

पुणे परिमंडळमध्ये वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ५२ हजाराहून अधिक ग्राहकांकडे सुमारे ३२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकूण २० हजार ५९९ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आलाय. महावितरणच्या या धडक मोहिमेमुळे ग्राहक धास्तावलेत. ज्यांची बिलं थकीत आहेत त्यांनी वीजबिल भरणा केंद्रांसमोर रांगा लावल्यात. उर्वरित ग्राहकांनीही तात्काळ बिल भरुन कारवाई टाळावी असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलंय.