पुणे: पुण्यामध्ये पुन्हा बोगस एनए ऑर्डर जोडून सदनिकांच्या बोगस दस्त नोंदणीचा आजही धुमाकूळ सुरू असल्याची माहिती स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी दिली.
मार्च, एप्रिल महिन्यातील एन ए ऑर्डर घोटाळ्यातील प्रकरणांमध्ये अद्याप कोणतेही प्रकारची कारवाई झालेली नाही.
पुण्यात बोगस येणे ऑर्डर जोडून आजही बोगस दस्त नोंदणी सुरूच आहे.
1 ते 27 मधील सर्व सब रजिस्टर, अधिकाऱ्यांना हाताशी धरून ऑफिस मध्ये राजरोसपणे बोगस नोंदणी करत आहेत.
यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
त्वरित कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.