पुणे ड्रग्ज प्रकरण; एमडी ड्रग्ज बनवायच्या फॉर्म्युलाचा कोडवर्ड उघड

Pune Crime News : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर आता ड्रग्जचं हब बनत चाललंय.. कारण पुणे पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत जी कारवाई केली, त्यानंतर सर्वच अवाक झालेत.. एक दोन कोटींचं नाही तर पुण्यात 4 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.

Updated: Feb 21, 2024, 08:28 PM IST
पुणे ड्रग्ज प्रकरण; एमडी ड्रग्ज बनवायच्या फॉर्म्युलाचा कोडवर्ड उघड title=

Pune Drugs Case : पुणे तिथे ड्रग्ज नाही उणे असंच म्हणायची वेळ आली आहे. कारण पुण्यात गेल्या तीन ते चार दिवसांत चार हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.. दोन हजार किलो एमडी ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलंय.. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आलीय.  एमडी ड्रग्ज बनवायच्या फॉर्म्युलाचा कोडवर्ड उघड झाला आहे. 

सर्वात मोठी कारवाई 

पुणे शहरातून तब्बल 4 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. गुन्हे शाखेनं शहरातील मध्यभागी असलेल्या पेठ परिसरात ही कारवाई करुन, 3 ड्रग्ज तस्करांना अटक केली. यातून ड्रग्ज तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड झालं. अमितेश कुमार पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. 

ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड कोण?

पुण्यात एमडी ड्रग्ज बनवण्याच्या फॉर्म्युलाच्या कोड वर्ड झी २४ तासच्या हाती लागला आहे. न्यू पुणे जॉब असं या कोड वर्डचं नाव आहे. न्यू पुणे जॅाबची जबाबदारी युवराज भुजबळवर होती. ऑक्टोबर 2023 पासूनच एमडी ड्रग्जची निर्मिती सुरु होती.   गोण्या उतरवणा-यांकडून या रॅकेटचं बिंग फुटलंय. पुणे पोलिसांनी हैदर शेखला अटक केली. मात्र तो तोंड उघडत नव्हता. तेव्हा पोलिसांनी मिठाच्या गोण्या उतरवणारे कामगार आणि टेम्पो चालकांचा शोध घेत चौकशी केली. त्यावेळी ही पोती कुरकुंभमधून आणली जात असल्याचं स्पष्ट झालं. 

आता तर पुणे ड्रग्स प्रकरणाचं सांगली कनेक्शनही समोर आलं आहे. या ड्रग्ज रॅकेटप्रकरणी या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलीये.  युवराज भुजबळ हा केमिकल एक्सपर्ट आहे. वैभव उर्फ पिंट्या माने हा लोकल पेडलर आहे  हैदर शेख हा सप्लायर असून अजय करोसिया हा ड्रायव्हर आहे. कुरकुंभमधल्या कंपनीचा मालक भिमाजी साबळे आहे. तर दिवेश भुतिया आणि संदीप कुमार यांचं दिल्लीत गोडाऊन असून त्यांची फूड कुरिअर सर्व्हिस आहे. सॅम ब्राऊन नावाने फिरणा-या परदेशी नागरिकाचा शोध पुणे पोलीस घेतायत.  या सॅम नावाच्या मास्टरमाईंडचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे. ब्राऊनकडून साबळे, भुजबळला 3 महिन्यात 2000 किलो एमडी बनवण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. ब्राऊननेच भुजबळला एमडी बनवण्याचा फॉर्म्युला दिला होता. शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज निर्मितीचं केंद्र अशी होतेय.  पुण्याभोवती ड्रग्जचा विळखा आवळला जातोय.. पुण्याला नशेच्या खाईत कोण ढकलतंय? पुण्याचा आता उडता पंजाब होतोय का असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. 

4 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त

18 फेब्रुवारी - सोमवार पेठेतील छापेमारीत 2 किलो एमडी जप्त करण्यात आले. 19 फेब्रुवारी - विश्रांतवाडीतील गोदामातून 100 कोटींहून अधिक किंमतीचे 55 किलो एमडी जप्त केले गेले.  20 फेब्रुवारी - कुरकुंभ एमआयडीसीतील कारखान्यात 1100 कोटींचं ड्रग्ज सापडलं. 20 फेब्रुवारी - पुणे पोलिसांची थेट दिल्लीत कारवाई. 800 कोटींचं 400 किलो एमडी हस्तगत करण्यात आले.  21 फेब्रुवारी - दिल्लीतून 1200 कोटींहून अधिक किमतीचे 600 किलो एमडी जप्त कपडण्यात आले.