पुणे पालिका भूखंड मूळ मालकाला देण्याच्या विषयाला नवे वळण

सिंहगड रस्त्यावरील महापालिकेचा भूखंड मूळ मालकाला परत देण्याच्या विषयाला नवीन वळण लागलंय.  महापालिकेचा भूखंड मूळ मालकाला परत देण्यास उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी विरोध केला आहे. 

Updated: Jan 31, 2018, 07:35 PM IST
पुणे पालिका भूखंड मूळ मालकाला देण्याच्या विषयाला नवे वळण title=

पुणे : सिंहगड रस्त्यावरील महापालिकेचा भूखंड मूळ मालकाला परत देण्याच्या विषयाला नवीन वळण लागलंय.  महापालिकेचा भूखंड मूळ मालकाला परत देण्यास उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी विरोध केला आहे. 

धेंडे यांच्याबरोबरच, आरपीआयच्या चार नगरसेवकांनीही या ठरावाला विरोध केला आहे. राज्य सरकारने हा ठराव विखंडीत करावा अशी मागणी धेंडे आणि आरपीआयच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी ठरावाविषयी चुकीची माहिती दिली असा गंभीर आरोपही धेंडे यांनी केला आहे.  कोर्टाच्या निर्णयाविषयी चुकीची माहिती मिळाल्यामुळे सभागृहात ठरावाला विरोध केला नाही असं आरपीआयच्या नगरसेवकांनी आणि उपमहापौरांनी म्हटलंय. 

सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. उशिरा का होईना, उपमहापौरांसह आरपीआयच्या चार नगरसेवकांनी विरोध केल्यानं भाजपाला घराचा आहेर मिळाला आहे. कारण, आरपीआय भाजपचा सहयोगी पक्ष आहे. तसेच , आरपीआयचे सर्व नगरसेवक भाजपच्या चिन्हावर विजयी झाले आहेत.