Pune Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड उर्फ बंडू तात्या (Bandu tatya Gaikwad) यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने (Saurabh Bandu Gaikwad) दारू पिऊन अपघात केल्याची माहिती समोर आली आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या या घटनेत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झालेत. त्याचबरोबर सौरभ गायकवाड हा देखील जखमी झालाय.
पुण्यातील मांजरी - मुंढवा रस्त्यावर म्हणजेच केशवनगरच्या झेड कॉर्नर येथे मंगळवारी पहाटे हा अपघात घडलाय. सौरभ गायकवाड हा त्याची MH 12 TH 0505 क्रमांकाची हॅरीयर कार घेऊन पहाटे पाच वाजता मुंढव्यातील घरी निघाला होता. त्यावेळी तो दारुच्या नशेत होता. त्यामुळे समोरुन येणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला त्याने धडक दिली.
सौरभ गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सौरभ गायकवाडचे वडील बंडू गायकवाड हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत आहेत. या प्रकरणात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
केशवनगर मांजरीच्या रस्तावर सकाळी 4 वाजल्यापासून वर्दळ सुरू होते. सकाळी मालवाहतुक टॅम्पो या रस्त्यावर असतात. अशातच सकाळी सौरभ गायकवाड भरवेगात गाडी चालवत असताना टॅम्पोला धडक दिली. त्यावेळी आजूबाजूने जात असलेल्या चालकांनी तिघांना बाहेर काढलं आणि प्रथमोपचार दिले. त्यानंतर घटनास्थळी पोलिस हजर झाले होते.