Pune Crime News : पुण्याला हादरवून टाकणारी घटना; विष प्राशन करून पती-पत्नीने दोन मुलांसह संपवलं आयुष्य!

Keshavnagar Crime New: शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

Updated: Jan 14, 2023, 12:53 AM IST
Pune Crime News : पुण्याला हादरवून टाकणारी घटना; विष प्राशन करून पती-पत्नीने दोन मुलांसह संपवलं आयुष्य! title=
Pune Keshavnagar Crime News

Pune News: पुणे शहराला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा केशवनगर (Keshavnagar) परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. (Pune Crime News Husband and wife ended their lives with two children in keshavnagar area)

शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली (Pune Crime News). त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली. 

शेअर मार्केटमध्ये (Share Market) आर्थिक नुकसान झाल्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. हे दांपत्य 2 महिन्यापूर्वी केशवनगर (Mundhawa, Keshavnagar) भागात एका घरात भाड्याने राहत होते. 

आणखी वाचा - ATM मधून पैसे निघाले नाहीत म्हणून गुगलची घेतली मदत, पण सायबर चोरट्यानं मारला डल्ला

दरम्यान, संशय आल्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिला. त्यांना घरातील बेडरूम मध्ये 4 जणांचे मृतदेह आढळून आले. शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नागरिकांना पोलिसांना दिली. सध्या पोलिस या प्रकरणाची सखोल माहिती घेत आहे. मात्र, या घटनेनंतर केशवनगर भागात तणावाचं वातावरण असल्याचं पहायला मिळतंय.