Pune Accident : धक्कादायक! पुण्यातील येरवडा चौकामध्ये भीषण अपघात; Video पाहून थरकाप उडेल

Yerwada Accident Video : सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. या अपघातात (Pune Accident) दुचाकीस्वाराचे दोन पाय निकामे झाले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेण्याचं आव्हान केलं जातंय.

सौरभ तळेकर | Updated: Jan 9, 2024, 07:32 PM IST
Pune Accident : धक्कादायक! पुण्यातील येरवडा चौकामध्ये भीषण अपघात; Video पाहून थरकाप उडेल title=
Pune Accident Biker Loses Both Legs

Pune Accident News : कधी कोणावर कसलं संकट येईल सांगता येत नाही. भारतात रस्ते अपघाताचं (Pune Accident) प्रमाण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशातच आता पुणे शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील येरवडा चौकात (Yerwada Accident) भीषण अपघाताचा एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. एका दुचाकी चालकाला ढंपरने उडवल्याचं पहायला मिळालंय. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. या अपघातात दुचाकीस्वाराचे दोन पाय निकामे झाले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेण्याचं आव्हान केलं जातंय.

नेमकं काय झालं? 

नेहमीप्रमाणे पुण्यातील येरवडा परिसरात वर्दळ सुरू होती. जीएसटी भवन वरुन येरवडाला जाणाऱ्या रस्त्यावर गोल्फ चौक (Golf Chowk) परिसरात सिग्नल लागला असताना एक दुचाकीस्वार रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी सिग्नलला पीएमपीएल बस उभी असते. तर काही गाड्या सिग्नलला उभ्या असतात. मात्र, सिग्नल जुगारून दुचाकीस्वाराने रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी काळाने घात केला. 

सिग्नल लागला असताना एका ढंपरने सिग्नल मोडला. ढंपरचा वेग जास्त असल्याने चालकाने समोरून येत असलेल्या दुचाकीस्वाराकडे पाहिलं नाही अन् मोठा अनर्थ घडला. दुचाकीस्वार थेट ढंपरच्या चाकाखाली आला. ढंपरच्या खाली येऊन दुचाकीचा चुराडा झाला, तसेच दुचाकी चालकाचे पाय देखील निकामे झाल्याची माहिती मिळाली आहे. हा सर्वप्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दरम्यान, दुचाकी वाहन चालकांकडून वाहतुकीचे सर्व नियम धब्ब्यावर बसवतात. एकीकडे येरवड्यात अपघात झाला असताना दुसरीकडे शिवाजीनगच्या रामेश्वर चौकात एका डंपरच्या चाकाखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. एकाने नो एन्ट्रीमधून दुचाकी आणल्याने दुसऱ्या एकाचा मृत्यू झालाय. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास पोलीस करत आहेत.