पोस्ट ऑफिस करणार उर्जेची निर्मिती

ज्यामुळे सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करणारे नागपूरचे मुख्य पोस्ट ऑफिस राज्यातील पहिले कार्यालय ठरणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 22, 2018, 11:27 PM IST
पोस्ट ऑफिस करणार उर्जेची निर्मिती title=

नागपूर : नागपूरच्या मुख्य पोस्ट ऑफिसची इमारतीला आता संपूर्ण ग्रीन इमारत म्हणून बदलविण्यात येणार आहे. यासाठी पुढच्या सहा महिन्यात ऊर्जा बचतीसाठी सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केली.

राज्यातील पहिले कार्यालय

ज्यामुळे सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करणारे नागपूरचे मुख्य पोस्ट ऑफिस राज्यातील पहिले कार्यालय ठरणार आहे.

विशेष शिबिराचे आयोजन 

पोस्टातील बचत खात्यांसोबत इतर खाते आधार कार्डशी लिंक करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या विशेष शिबिराचे उद्घाटन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी बावनकुळे बोलत होते.