जळगाव : जळगावात एक अजब योगायोग पाहायला मिळाला आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग पाहायला मिळाला आहे. एकाच घरातील दाम्पत्याचा राजकीय योगायोग पाहायला मिळाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपकडे अडीच वर्ष असलेली सत्ता शिवसेनेने खेचून महापालिकेवर भगवा फडकवला आहे.
भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्यांचे पती सुनील महाजन हे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद पत्नीकडे, तर विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे महापौर व विरोधी पक्षनेतेपद हे एकाच पक्षाकडे आहे.
२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७५ पैकी ५७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. शिवसेनेला अवघ्या १५ जागा मिळाल्या होत्या. एमआयएमच्या तीन जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेला मिळाले. शिवसेनेचे सुनील महाजन विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पाडत आहेत. बंडखोर नगरसेवकांना अद्यापही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच राहिले आहे.
या राजकीय योगायाोगामुळे सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. एकाच कुटुंबात दोन पक्षाचे नेते कार्यकरत आहे. या राजकीय योगाची जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या या नवरा -बायकोचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.