ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती. यानंतर वर्तकनगर पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वालचंद गिट्टे असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्तकनगर पोलिसांनी भारतीय कलम 354 (डी), 509 आणि 500 आणि सूचना प्रौद्योगिक धारा 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या तक्रारीनुसार आरोपीने सुप्रिया सुळे यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या आक्षेपार्ह ट्विटनंतर ही कारवाई केली गेली. या ट्विटमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावनांना दु:ख पोहोचलं आहे असं या तक्रारीमध्ये आव्हाड यांनी म्हटलं होतं.