पिंपरीच्या गुंडाचा एन्काऊंटर स्पेशलिस्टला मारण्याचा कट

पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या आठवड्याभरात विविध गुन्ह्यांसाठी अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. 

Updated: Dec 3, 2017, 09:20 PM IST
पिंपरीच्या गुंडाचा एन्काऊंटर स्पेशलिस्टला मारण्याचा कट  title=

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या आठवड्याभरात विविध गुन्ह्यांसाठी अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. त्यातल्या बेकायदा शस्त्र बाळगण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी धक्कादायक कबुली दिलीय.

पुणे ग्रामीण पोलिसांत कार्यरत असलेल्या एका एन्काऊंटर स्पेशालिस्टला संपवण्याचा कट पिंपरीतल्या टोळ्यांनी केल्याचं तपासात पुढं आल्याची चर्चा आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट आपला गेम करतील या भीतीने त्यांनी हा कट रचल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे शहरात एकच खळबळ उडालीय.

पोलीस या प्रकरणावर बोलायला तयार नाहीत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपनं हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत पोलीस आयुक्तालयासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय.