पोलिसांची २ वेगवेगळी रुपं पाहा...ठरवा काय चांगलं काय वाईट?

 सर्वच क्षेत्रात चांगली वाईट माणसं असतात, याचा प्रत्यय तुम्हाला खालील २ व्हिडीओ पाहून येणार आहे.

Updated: Dec 17, 2020, 10:55 AM IST
 पोलिसांची २ वेगवेगळी रुपं पाहा...ठरवा काय चांगलं काय वाईट? title=

पिंपरी चिंचवड :  पोलिसांमध्ये देखील एक माणूस असतो, तो चांगला किंवा वाईट असणारंच. सर्वच क्षेत्रात चांगली वाईट माणसं असतात, याचा प्रत्यय तुम्हाला खालील फोटो पाहून येणार आहे.पोलिसांची दोन रुपं शहरातील २ वेगवेगळ्या घटनांमध्ये दिसून आली आहेत. एका घटनेत महिला पोलीस थेट आपल्या खिशात लाच घेताना दिसत आहे.  वरिष्ठ अधिकारी बाजूला असताना त्यांची नजर चुकवून लाच कशी घेतली जाते याचा हा व्हिडीओ आहे.

 पिंपरीतील शगून चौकातील ही घटना आहे, एटीएमने दंड वसूली सुरु असली, तरी लाच घेण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्या जात आहेत. या महिला पोलिसाच्या खिशात एक महिला नोट ठेवत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. 

दुसऱ्या एका घटनेत एका चौकात सिग्नलच्या मधोमध दुचाकीस्वाराची गव्हाची गोणी सांडली आहे. चारही बाजून वाहतूक दिसत आहे. मात्र तरीही हे सांडलेले गहू भरण्यासाठी या दुचाकीस्वारांना पोलीस मदत करत असल्याचं दिसून येत आहे. पोलिसांची ही दोन वेगवेगळी रुप समोर आली आहेत.