व्हिडिओ : पोलिसांच्या गाडीतच रंगला 'ओल्या पार्टी'चा थरार

ड्युटीवर असताना दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्या बाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झालीय...  पिंपरी-चिंचवड जवळच्या देहू रोड जवळच्या पोलिसांची ही 'कर्तबगारी'...

Updated: Apr 4, 2018, 11:33 PM IST
व्हिडिओ : पोलिसांच्या गाडीतच रंगला 'ओल्या पार्टी'चा थरार title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : ड्युटीवर असताना दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्या बाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झालीय...  पिंपरी-चिंचवड जवळच्या देहू रोड जवळच्या पोलिसांची ही 'कर्तबगारी'...

पुणे बंगळुरू महामार्गावर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ समाज माध्यमात चांगलाच गाजला. पोलिसांनी गाडीतच केलेल्या ओल्या पार्टीने खळबळ माजली. देहू रोड पोलीस स्टेशनवर काम करणारे बी. के. साबळे हे दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते योगेश मालखरे यांनी चित्रीत केला. मालखरे अजूनही आपल्या दाव्यावर ठाम आहेत. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर योगेश मालखरे यांच्यावरही बी के साबळे यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मालखरे आणि साबळे या दोघांची प्राथमिक तपासणी केलीय. पोलिसांनी या संबंधी काही प्रतिक्रिया दिली नसली तरी चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय. 

या व्हीडीओमुळे खळबळ उडालीय. संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलीसच असे कायदा खुंटीला टांगणार असतील तर कठीण आहे.