धक्कादायक : पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब

  पिंपरी चिंचवडमधल्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब झालं आहे. ऐकून धक्का बसला असेल. पण हे खर आहे.

Updated: Apr 8, 2018, 01:50 PM IST

पिपंरी चिचंवड :  पिंपरी चिंचवडमधल्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब झालं आहे. ऐकून धक्का बसला असेल. पण हे खर आहे. नद्यांच्या पात्राला जलपर्णींचा एवढा विळखा पडलाय की त्यामुळे नदीचं पात्रच दिसेनासं झालंय. जलपर्णीमूळे प्रदूषण तर होतंच आहे, सोबतच डासांची पैदासही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरातले नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासनानं याबाबत कॅमे-यावर बोलायला नकार दिलाय. मात्र ही जलपर्णी काढण्याकरता ३७ लाख रुपयांचं टेंडर काढल्याचं सांगितलंय. मग हे पैसे नेमके गेले कुठे गेले असा प्रश्न उपस्तिथ होतोय.