सातारा : साताऱ्यातल्या सासवड गावाजवळच्या विहिरींमध्ये चक्क पेट्रोल सापडू लागलं आहे. एकीकडे पेट्रोलचे दर शंभरी गाठत असताना विहिरीत असं पेट्रोल मिळू लागलं तर.... पण विहिरीतल्या पेट्रोलमागचे कारण फार वेगळं आहे. हे पेट्रोल चक्क पेट्रोल चोरीमुळे विहिरीत आलं आहे.
साता-यात पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेणारी उच्च दाबाची पाईपलाईन फोडलीय. हिंदुस्थान पेट्रोलियमची मुंबई पुणे सोलापूर अशी २२३ किलोमीटरची पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईनला चोरट्यांनी सासवड गावाजवळ मोठं भगदाड पाडलं. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मात्र लाखो रुपयांचं हजारो लिटर पेट्रोल जमिनीत मुरलं, आणि या भागातील विहिरीतील पाण्यात पेट्रोल मिसळलं गेलं. तर यामुळे अनेक एकर शेतांतील उभ्या पिकांचंही नुकसान झालं आहे.