पेट्रोल पंपावर छेडछाड करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

पेट्रोल चोरी करण्यासाठी पेट्रोल पंपावर छेडछाड करणाऱ्या भारतातील मुख्य आरोपी प्रकाश नुलकर (५६,रा. लोअर परेल) याला ठाणे क्राईम ब्राँचच्या पथकाने हुबळी येथून अटक केली .

Updated: Jul 12, 2017, 03:49 PM IST
 पेट्रोल पंपावर छेडछाड करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक title=

ठाणे : पेट्रोल चोरी करण्यासाठी पेट्रोल पंपावर छेडछाड करणाऱ्या भारतातील मुख्य आरोपी प्रकाश नुलकर (५६,रा. लोअर परेल) याला ठाणे क्राईम ब्राँचच्या पथकाने हुबळी येथून अटक केली .

आरोपी हा मिडको पेट्रोल पंप मशीन मेनिफॅक्चरिंग कंपनीत काम करत होता..काम सोडल्यानंतर या कामाला सुरुवात केली. मशीन छेडछाड करण्यासाठी तो ५० हजार ते दीड लाख रुपये घेत होता.

 पेट्रोल पंपावर मायक्रो चिप्स (डिव्हाईस) लावून पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी प्रकाश नुलकर आहे. तो पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पंपावर मायक्रो चिप्स (डिव्हाईस) लावून पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांचे पेट्रोल चोरी करत असल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली होती. 

या प्रकरणी उत्तर प्रदेशातून फरारी असलेल्या विवेक शेट्टे (४७, रा. लोढा हेवन, निळजे डोंबवली ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण पथक आणि एसटीएफ यांनी डोंबवली येथून अटक केली होती. तर या चिप्सचे (डिव्हाईस) संचालन करण्यासाठी रिमोट तयार करणाऱ्या अविनाश नाईक याला पुण्यातून अटक करण्यात आली होती. 

या दोघां आरोपींकडून ११० माइक्रोचिप्स आणि १७७ रिमोटसह ऑसिक्लोस्कोप आणि प्रोग्रामर हस्तगत करण्यात आले होते. त्यानंतर प्रकाशची शोध मोहीम पोलिसांनी घेतली आणि त्यांना यात यश आले.