नाणार केमिकल रिफायनरी विरोधात स्थानिक आक्रमक

 नाणारच्या पेट्रो केमिकल रिफायनरी विरोधात स्थानिक आणखी आक्रमक

Updated: Jul 18, 2018, 05:08 PM IST
नाणार केमिकल रिफायनरी विरोधात स्थानिक आक्रमक  title=

रत्नागिरी : नाणारच्या पेट्रो केमिकल रिफायनरी विरोधात स्थानिक आणखी आक्रमक झालेयत. आज  ग्रामस्थांनी धरणं आंदोलन केलं. राजापुरच्या डोंगरतिठामध्ये १४ गावातल्या नागरिकांनी  एकत्र येत सरकराचा निषेध नोंदवला. 

ज्या शेतकऱ्यांनी नाणारसाठी जमिनी दिल्या त्यांची नावं का जाहीर केली जात नाही असंही सवाल ग्रामस्थांनी केलाय. ज्यांनी संमती दिली ते सगळेच शहा मोदी मेहताच असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी यावेळी केला. इथल्या  जमिनीवर एक पाऊलही ठेऊ देणार नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिलीय.