कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनचे तीनतेरा, नागरिकांमध्ये गांभीर्य नाही

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे

Updated: May 14, 2020, 11:32 AM IST
कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनचे तीनतेरा, नागरिकांमध्ये गांभीर्य नाही title=

आतिष भोईर, कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. मात्र तरीही नागरिक बिनधास्तपणे बाहेर पडताना दिसत आहेत. केडीएमसीने संपूर्ण महापालिका क्षेत्र लॉकडाऊन घोषित केलं असून जीवनावश्यक वस्तूंची दुकानात काऊंटर विक्री करण्यासं बंदी घातली आहे. फक्त होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. तरीसुद्धा दुकानं ही सुरूच असून काऊंटरवर मालाची विक्री सुरुच आहे. 

याआधी आत्यावशक सेवेतील लोकांनाच पेट्रोल दिलं जात होतं. मात्र पेट्रोल पंपावर आता सर्वांना पेट्रोल मिळू लागल्याने रस्त्यावर मोठया प्रमाणात गाड्या फिरताना दिसत आहे. कल्याणमध्ये लॉगडाऊन आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात रुग्णांची संख्या एकीकडे चिंतेचा विषय बनला असताना नागरिक मात्र बिनधास्तपणे बाहेर फिरत आहे. सकाळी मॉर्निग वॉक पासून ते रात्री जेवल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. 

गुरुवारी कल्याण-डोंबिवलीत २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर कोरोनाचे १८ नवे रुग्ण आढळले होते. कल्याण-डोंबिवली क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ३८५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १३० जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे.