कोल्हापुरात स्मशानभूमी वाद, पालिकेत प्रतिकात्मक तिरडी

शहरातील पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाची मागणी करत नगरसेवक अफलज पिरजादे यांनी थेट सभागृहातच प्रतिकात्मक तिरडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Nov 29, 2017, 09:16 PM IST
कोल्हापुरात स्मशानभूमी वाद, पालिकेत प्रतिकात्मक तिरडी title=

कोल्हापूर : शहरातील पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाची मागणी करत नगरसेवक अफलज पिरजादे यांनी थेट सभागृहातच प्रतिकात्मक तिरडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. 

मात्र , कर्मचाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. एवढ्यावरच पिरजादे गप्प न बसता तिरडी सोबत आणलेले पेटती लाकडं त्यांनी आयुक्तांच्या समोर ठेवत या प्रश्नाकडे लक्ष वेधत घोषणाबाजी केली. 

तर, सत्ताधारी काँग्रेसने पालकमंत्री निधी देत नसल्यामुळे शहराचा विकास रखडल्याचा आरोप केल्याने सभागृहात सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला