उस्मानाबाद दुहेरी खून : शिक्षा ठोठावल्यानंतर न्यायालयात महिलेचा गोंधळ

दुहेरी खून प्रकरणी एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर तिनं न्यायालयातच प्रचंड गोंधळ घातला. 

Updated: Jan 30, 2018, 05:32 PM IST
उस्मानाबाद दुहेरी खून : शिक्षा ठोठावल्यानंतर न्यायालयात महिलेचा गोंधळ title=

उस्मानाबाद : दुहेरी खून प्रकरणी एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर तिनं न्यायालयातच प्रचंड गोंधळ घातला. 

 एसटीमध्ये बस कंडक्टर

मीनाक्षी पांचाळ असं या महिलेचं नाव असून, एसटीमध्ये महिला बस कंडक्टर म्हणून ती कामाला होती. उस्मानाबाद जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयानं तिला दुहेरी खून प्रकरणी दोषी ठरवून, जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

सासूला पेटवून दिले

२६ मार्च २०१५ रोजी कळंब शहरात मीनाक्षीनं आपल्या सासूच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं. त्यावेळी सासूच्या मांडीवर मीनाक्षीची तीन वर्षांची मुलगी बसली होती. त्यात दोघींचाही जळून मृत्यू झाला.

न्यायालयातच गोंधळ 

न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर तिनं आणि तिच्या आईने न्यायालयातच गोंधळ घालायला सुरूवात केली. तेव्हा पोलिसांनी दोघींनाही अटक केली.