सोलापूर : Governor Bhagat Singh Koshyari in Solapur : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याला शिवप्रेमींनी विरोध केला आहे. यावेळी राज्यपाल समजून आंदोलकांनी पोलिसांना दाखवले काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान, कोश्यारी यांनी चकवा देत नियोजित कार्यक्रमस्थळी दाखल झालेत. (Opposition to Governor Bhagat Singh Koshyari's visit to Solapur)
छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपालांच्या दौऱ्याला शिवप्रेमींनी विरोध केला. राज्यपालांच्या दौऱ्यावेळी काही जणांनी काळे झेंडे दाखवले. पण, त्या ताफ्यामध्ये राज्यपाल नव्हते. फक्त पोलिसांचाच ताफा कार्यक्रमस्थळी जात होता. आंदोलकांना चकवा देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विमानतळावरून हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळी पोहोचले.