ऑनलाईन शिक्षणासाठी मागवला मोबाईल, फसवणूक झाल्याने मुलाने केली आत्महत्या

 ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल  मागवला होता पण ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाली. याच्या नैराश्यातून मुलाने केली आत्महत्या केली. 

Updated: Oct 9, 2020, 06:49 PM IST
ऑनलाईन शिक्षणासाठी मागवला मोबाईल, फसवणूक झाल्याने मुलाने केली आत्महत्या  title=

चंद्रपूर : सध्या कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल  मागवला होता पण ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाली. याच्या नैराश्यातून मुलाने केली आत्महत्या केली. ऑनलाईन मोबाईल खरेदीत फसवणूक झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका तरुणांने टोकाचे पाऊल उचलत थेट आत्महत्या केली. 

चिमूर तालुक्यातील पूयारदंड भागातल्या रोहित राजेंद्र जांभुळे या युवकाने हे टोकाचे पाऊल उचलले. काही दिवसांपूर्वी त्याने ऑनलाईन १५ हजार रुपयांच्या मोबाईलची खरेदी केली त्यासाठी त्याने ऑनलाईन १० हजार रुपये भरले आणि उर्वरित ५ हजारांची कशीबशी जुळवाजुळव केली. प्रत्यक्षात जेव्हा पार्सल घरी आले तेव्हा त्यात २ रुपयांची रिकामी पाकिटे, एक बेल्ट आणि खरड्याचा तुकडा अशा वस्तू आढळल्या. त्यामुळे निराश झालेल्या रोहितने घराजवळील विहिरीत झोकून आत्महत्या केली. मोबाईल कंपनीवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. 

युवकाला पोस्टातून  कॉल आला. युवकाने पार्सल घेण्यासाठी पैसे नसल्याने आईकडे पैशाची मागणी केली. आईने पैशाची जुळवाजुळव करून मुलासोबत पोस्टामध्ये पार्सल आणायला गेली. सर्व प्रक्रिया पूर्ण करून कंपनीने पाठविलेले पार्सल आईने आणि मुलाने उघडले. मात्र त्या पार्सलमध्ये मोबाईल नव्हता. त्यांना धक्का बसला.  युवकाला आपली मोबाईल कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कंपनीच्या संपर्क क्रमांकावर फोन केला. परंतु त्या कंपनीला फोनच लागत नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने १५ हजार रुपयांचा भुर्दंड बसल्याने आई-वडिलांना धक्का बसला आहे.

फसवणूक झाल्याने रोहित काल दुपारपासून घरातून बेपत्ता झाला. आईवडिलांनी नातेवाईक , मित्र परिवाराकडे विचारपूस केल्यावर त्याचा शोध लागला नाही. शेवटी आज सकाळी गावातील शेतकरी आणि महीला शेतात जात असतांना मुलाची गाडी- कपडे विहीरीजवळ दिसल्यामुळे विहिरीत त्याचा शोध घेतला. त्यावेळी त्याचा मृतदेह सापडला. रोहितने कमरेला दगडाने भरलेली पोतडी बांधून विहीरीत उडी घेत आपला जीव संपविला. या घटनेने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

दरम्यान, बारावीत शिकत असलेल्या रोहितने ऑनलाईन शिक्षणासाठी हा मोबाईल विकत घेण्याचा हट्ट केला होता, असा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.