लासलगावमध्ये कांद्याच्या भावात आज ७०० रुपयांची घसरण

किरकोळ बाजारात मात्र कांद्याचा भाव वाढला आहे.

Updated: Oct 21, 2020, 11:37 AM IST
लासलगावमध्ये कांद्याच्या भावात आज ७०० रुपयांची घसरण title=

लासलगाव : कांद्याचे भाव वाढत असताना आज मात्र कांद्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण झाली. लासलगाव बाजार समिती कांद्याचे लिलाव सुरू होताच मंगळवारच्या तुलनेत आज 700 रुपयांचा कमी भाव कांद्याला मिळाला. कांद्याला आज जास्तीत जास्त 7 हजार 100 रुपयांचा भाव मिळाला. कांद्याची प्रतवारी खालवलेली विक्रीसाठी येत असल्याने बाजार भावात घसरण पाहायला मिळाली. 450 वाहनातून 5 हजार क्विंटलची कांदा आवक होती. 

सरासरी 5800 रुपये तर कमीतकमी 1600 रुपये प्रतिक्विंटलचा बाजार भाव आज लासलगाव बाजार समितीमध्ये मिळाला.

आज कांदा घाऊक बाजारात ८० रुपये किलोवर पोहोचला आहे. कांद्याच्या भावात होणार वाढ कायम आहे. परदेशी, कमी भावाचा कांदा बाजारात असून देखील देशी कांद्याची भाववाढ सुरुच आहे. त्यामुळे कांदा १०० रुपये किलोवर पोहोचण्याची शक्यता आहे.

मुंबईत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. दिवाळीपर्यंत तरी कांद्याचे भाव असेच राहण्याची शक्यता आहे. भाव नियंत्रणात आणण्यासाठी इराणमधून कांदा मागवला गेला. पण तरी देखील कांद्याचा भाव वाढत आहे.