धक्कादायक : बायको आणि मुलीची हत्या करुन एकाची आत्महत्या

  लोणावळ्यातल्या क्रांतीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. बबन जयवंत धिंदळे या अडतीस वर्षीय इसमाने बायको आणि मुलीची हत्या करून स्व:त आत्महत्या केलीय. 

Updated: Jun 25, 2017, 03:58 PM IST
धक्कादायक : बायको आणि मुलीची हत्या करुन एकाची आत्महत्या  title=

लोणावळा :  लोणावळ्यातल्या क्रांतीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. बबन जयवंत धिंदळे या अडतीस वर्षीय इसमाने बायको आणि मुलीची हत्या करून स्व:त आत्महत्या केलीय. 
 
 मुलालाही मारण्य़ाचा त्यानं प्रयत्न केला मात्र यात मुलगा बचावलाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  
 
 बबननं 30 वर्षीय पत्नी दिपाली आणि 11 वर्षीय मुलगी दिप्तीची दोराच्या सहाय्यानं गळा आवळून हत्या केली. 9 वर्षीय मुलगा रोहितलाही गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला पण यात रोहित बचावलाय. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत.