प्रफुल्ल पवार / रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात भली मोठी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्पच आहे. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही दरट कोसळली. त्यात पाऊस सुरु असल्याने रात्री दरड हटविणे कठिण जात होते. दरम्यान, सकाळपर्यंत दरट हटविण्याचे काम अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे काल रात्रीपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंदच आहे.
मुंबई - गोवा महामार्गावर धामणदेवी गावाजवळ रात्री ८ वाजता कोसळली दरड होती. या दरडीचा जवळपास २०० मीटर लांब रस्त्यावर मातीचा ढिगारा आला आहे. त्यामुळे ही दरड बाजुला करण्यास उशीर होत आहे. एक जेसीबी आणि एका पोकलेनच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, आज सकाळपर्यंत दरड हटविण्याचे काम सुरु असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अद्यापही ठप्पच आहे.
#BreakingNews मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक ठप्पच । कशेडी घाटात दरड कोसळली । महामार्गावरील दरड बाजुला करण्याचे काम अद्याप सुरुच । काल रात्री ८ वा जण्याच्या सुमारास दरड कोसळून वाहतूक बंद @ashish_jadhaohttps://t.co/7va86KdVYR pic.twitter.com/EkgGEQiebL
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 10, 2020
घटनास्थळी पोलादपूर पोलीस आणि एल अँड टीची टीम पोहोचली आहे. दरड रस्त्यावरुन बाजुला करण्याचे काम पूर्ण व्हायला किमान १० तास लागण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती देताना सांगितले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक जवळपास १० तास ठप्पच आहे. दरम्यान, वाहतूक म्हाप्रळ आंबेत मार्गे वळवण्यात आली आहे.
कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग राहणार रात्रभर ठप्प.
पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत कोसळली दरड.महामार्गावरील वाहतूक बंद, पोलादपूर पोलिस,एलअँडटीची टीम घटनास्थळी दाखल; रात्रभर दरड उपसण्याचे काम सुरू राहणार.कशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2020