हलालच्या धर्तीवर ओम सर्टिफिकेट! 'दुकानदारांना प्रमाणपत्र घ्यावाच लागेल' हिंदुत्ववादी संघटनांची मोहिम

हलाल प्रमाणपत्राच्या पार्श्वभूमीवर आता हिंदू संघटनांनी ही आज पासून ओम प्रमाणपत्र जारी केले आहे.  धार्मिक नगरी असलेल्या त्र्यंबकेश्वर मध्ये ओम प्रतिष्ठानचे रणजीत सावरकर यांनी साधू महंतांच्या उपस्थितीत केली.

वनिता कांबळे | Updated: Jun 14, 2024, 06:58 PM IST
 हलालच्या धर्तीवर ओम सर्टिफिकेट! 'दुकानदारांना प्रमाणपत्र घ्यावाच लागेल' हिंदुत्ववादी संघटनांची मोहिम title=

Halal Vs Om Certificate : देशातील मंदिरांबाहेर प्रसाद विक्रेत्यांसाठी ओम प्रमाणपत्र सुरू करण्यात आलेत. हलाल प्रमाणपत्राच्या पार्श्वभूमीवर हे प्रमाणपत्र असणारेत असा दावा करण्यात येतोय..रणजीत सावकर यांच्या ओम प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून हे प्रमाणपत्र देण्यात येणारेत. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर अन्न आणि औषध प्रशासनाने छापे टाकत प्रसाद विक्रेत्यांवर कारवाई केली होती...त्यापार्श्वभूमीवर प्रसादाच्या शुद्धीकरणाच्या दृष्टीने ओम प्रमाणपत्र सुरू करण्यात आल्याचं हिंदू संघटना सांगताय. प्रसादाच्या शुध्दीकरणासाठी काय निकष असणारेत याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने हात वर केलेत.

मंदिरांमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या प्रसादाचे पावित्र्य, सात्विकता आणि शुद्धता अबाधित रहावी यासाठी हिंदुत्व संघटनांनी पुढाकार घेतला आहे. देशातील सर्व प्रसाद विकणाऱ्या दुकानांना ‘ओम प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. प्रसादात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये अशुद्ध घटक वापरले जात नाहीत ना याची खात्री केली जाणार असून त्यानंतरच ‘ओम प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे.यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांची‘ओम प्रतिष्ठान’ ही संस्था काम करणार आहे. 

मंदिरान बाहेर विकले जाणारे पेढे प्रसादाची शुद्धता अन्न औषध प्रशासनाने छापे टाकत नाशिक मध्ये समोर आणली होती. आता हे प्रमाणपत्र ही पवित्रता शुद्धता कशी सिद्ध करणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही . मात्र या प्रमाणपत्र ला कुठलीही शासकीय मान्यता नसली तरी हलालप्रमाणे आम्हालाही असे प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार असल्याचं दावा यावेळी प्रतिष्ठानच्या संचालकांनी केला. 

ओम प्रमाणपत्राबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी टीका केलीये...कोण विचारतो प्रमाणपत्राला...असं जितेंद्र आव्हाड आंनी  म्हटल आहे.