राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट

Non-bailable warrant issued by Parli court against Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय.  

Updated: May 6, 2022, 01:29 PM IST
राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट title=

बीड : Non-bailable warrant issued by Parli court against Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. शिराळा कोर्टानंतर आता परळी न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन सांगलीनंतर आता परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. जामीन घेतल्यानंतरही सतत कोर्टामध्ये गैरहजर राहिल्याने परळी न्यायालयाने पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. 

यापूर्वी 10 फेब्रुवारीला न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते आणि 13 एप्रिल पर्यंत न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात सांगितले होते, मात्र राज ठाकरे हे 13 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर न झाल्याने पुन्हा दुस-यांदा परळी कोर्टानं राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढलेत. 

राज ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

न्यायालयाच्या या निर्णयाने राज ठाकरे यांची डोकेदुखी वाढलीय. मराठी पाट्या आणि मराठी मुद्द्यावर आंदोलन केल्यानंतर बळजबरी दुकानं बंद करणं, दुकानं बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडणं याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात परळी कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. जामीन घेतल्यानंतरही सतत कोर्टामध्ये गैरहजर राहिल्यानं कोर्टानं हे आदेश दिलेत. परळी कोर्टानं 10 फेब्रुवारीला अटक वॉरंट काढलं होतं आणि 13 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. 

दरम्यान राज ठाकरेंविरोधात दोन अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आल्यानंतर गृहमंत्रालयाच्या हालचाली वाढल्यायत. राज ठाकरे यांच्या सभांमुळे राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलीय. तर जुन्या केसेस वरुन विरोधकांना मुद्दाम त्रास देण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली आहे.