शिरुर : शिरुरच्या मतदरांनी आपला कौल राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाजूने दिला आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांना फायदा होणार असल्याचे म्हटले जात होते. येथे राष्ट्रवादीच्या एकोप्याचा अभाव असून शिवाजीराव आढळरावांच्या विरोधात सक्षम उमेदवार नसल्याची चर्चा होती. पण डॉ. कोल्हे यांनी सर्व ताळेबंद खोटे ठरवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शिवाजीराव आढळराव हे मतदार संघातील आपली प्रतिमा जपण्यात अयशस्वी ठरले. शिवसेनेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. २९ एप्रिलला शिरुरमध्ये मतदान प्रतक्रिया पार पडली होती. राष्ट्रवादीने येथे अभिनय विश्वातून राजकारणाकडे वळलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे शिवसेनेतून राष्ट्रवादीकडे येणाऱ्या कोल्हे यांच्या पाठिशी शिरुरचा मतदार राजा उभा राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं होते. डॉ. कोल्हे यांच्या या विजयाला राजकीय वर्तुळात खूप महत्त्व आहे.
11:38 AM- आढळराव पाटील - १९३८७२ अमोल कोल्हे - २१०३९८ अमोल कोल्हे १६५२६ मतांनी आघाडीवर
9:10- AM शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हे 14 हजार मतांनी आघाडीवर
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
शिवाजीराव आढळराव पाटील | भाजप | 643415 |
देवदत्त निकम | काँग्रेस | 341601 |
अशोकराव खांडेभराड | मनसे | 36448 |
सरजेराव वाघमारे | बसपा | 19783 |
सोपानराव निकम | आप | 16663 |