गडचिरोली : राज्यात नक्षलवाद्यांकडून हिंसक कारवाई सुरुच आहे. येथील वनविभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी आग लावली. त्यामुळे या आगीत साठा करुन ठेवलेले लाकूड जळून खाक झाले. त्यामुळे मोठे नुकसान झालेय. दरम्यान, आग बघता बघता भडकली आणि धुरांचे लोट आकाश पसरलेत. अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, दंगली प्रकरणी मंगळवारी सकाळी पुण्यासह नागपूर येथील एल्गार परिषद, भीमा-कोरेगाव दगडफेकीचा नक्षलवादी कारवायांशी नाव जोडले गेले. त्यानंतर पोलिसांनी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर धाड टाकली. पोलिसांनी मुंबई-पुण्यासह नागपूरमध्ये देखील छापेमारी केली. यामुळे बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी हा प्रकार घडवून आणला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र, अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
Maharashtra: Naxals set fire to forest department's wood depot in Gadchiroli last night pic.twitter.com/xb9CDksnNx
— ANI (@ANI) April 18, 2018
नक्षल्यांचा धुमाकूळ सुरुच आहे. वन विभागाच्या लाकूड डेपोला आग लावली. गडचिरोली जिल्ह्यातील घोट वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या वन विभागाच्या सागवान डेपोला नक्षल्यानी आग लावली. आगीत संपूर्ण डेपो जळून खाक झाला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आहेत. अजून आग आटोक्यात नाही. जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या आहेत. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.