निसर्ग चक्रीवादळ : नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा बुधवारी रत्नागिरी दौरा

निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे.

Updated: Jun 13, 2020, 06:43 PM IST
निसर्ग चक्रीवादळ : नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा बुधवारी रत्नागिरी दौरा title=

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक बुधवारी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहे. नुकसानीची पाहाणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

बुधवारी १७ जून रोजी सकाळी ९ वाजता केंद्रीय पथक महाडपासून दौरा सुरु करणार असून त्यानंतर तेथून मंडणगडकडे रवाना होणार आहे.

सकाळी १० वाजता मंडणगड येथून, सकाळी १०.३० वाजता आंबडवे येथे नुकसानीची पाहाणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता शिगवण येथे नुकसानीची पाहाणी करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १२च्या दरम्यान केळशी येथे केंद्रीय पथक पोहचून पाहाणी करेल.

दुपारी १२.३० वाजता आडे, दुपारी १.१० वाजता पाजपंढारी, दुपारी १.५० वाजता दापोलीत नुकसानीचा पाहाणी दौरा करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता मुरुड, दुपारी ३.३५ वाजता कर्दे, सायंकाळी ४.३० वाजता दापोली येथे आगमन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सादरीकरण करण्यात येईल.

दुसऱ्या दिवशी गुरुवारी १८ जून रोजी सकाळी ९ वाजता केंद्रीय पथक दापोलीतून मांडवा जेट्टी, रायगड जिल्ह्याकडे रवाना होणार आहे.