कोरोनामुळे विपश्यना केंद्रावर पहिल्यांदाच आली 'ही' वेळ

 परदेशी नागरिकांसोबत भारतीय साधकांचे ही कोर्सेस अनिश्चित काळासाठी बंद 

Updated: Mar 10, 2020, 08:38 PM IST
कोरोनामुळे विपश्यना केंद्रावर पहिल्यांदाच आली 'ही' वेळ title=

योगेश खरे, झी २४ तास, इगतपुरी : कोरोना व्हायरसच्या दहशतीने नाशिकमधील विपश्यना केंद्र पाच दशकात पहिल्यांदाच बंद ठेवण्याची वेळ आली आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाने तशी नोटीस बजावल्याने केंद्राने परदेशी नागरिकांसोबत भारतीय साधकांचे ही कोर्सेस अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत.

११ तारखेच्या कोर्ससाठी देशविदेशातील साडेपाचशे साधकांनी नोंदणी केली होती. परदेशातून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत विपश्यना केंद्र बंद करण्याचे निर्देश दिलेत. 

कोरोनाच्या भीतीने आम्ही परत जात आहोत. दहा दिवसाच्या कोर्ससाठी आलो मात्र केंद्र बंद असल्याने आम्हाला परत जावे लागतेय असे साधक शीतल पमनानी यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात जिथेजिथे परदेशी पर्यटक येत आहेत किंवा गर्दी होत आहे अशा सर्व ठिकाणांना आम्ही गर्दी टाळण्यासाठी आवाहन केलं आहे .त्यात काही विपश्यना केंद्र योगा केंद्र मेडिटेशन सेंटर असल्याचे नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.

धम्माधम्म विपश्यना केंद्राच्या प्रशासनानं याबाबत दिलगिरी व्यक्त केलीये. जिल्हा प्रशासनाने आम्हाला मध्यरात्री नोटीस बजावली त्यामुळे आज सकाळपासून आम्ही सर्व कोर्सेस बंद करत आहोत धोरणाचा परिणाम असेल तोपर्यंत बंदरातील जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे पुढील कोर्सेस सुरू होतील अस विपश्यना केंद्राचे मुख्य व्यवस्थापक प्रेमजी सावला यांनी सांगितले.

यामुळे साधकांची निराशा झाली असली तरी कोरोना रोखायचा असेल, तर असे उपाय योजले पाहिजेत हेदेखील सर्वांनाच मान्य आहे.