योगेश खरे, झी मीडिया, मुंबई : एकाद्या गल्लीतून जावं, आणि समोर कधी कुत्रा येईल आणि चावेल, याची प्रचंड भीती सध्या नाशिकमध्ये आहे. सध्या या कुत्र्यांपासून पळ काढता काढता नाशिककरांच्या नाकी नऊ आलेत. नाशिक सध्या कुत्र्यांच्या दहशतीत आहे. नाशिकच्या विविध भागांत कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय. सातपूर परिसर सर्वाधिक या चाव्यांनी बेजार आहे.
एका दिवशी कुत्रे सरासरी ३५ जणांचा चावा घेतात... गेल्या वीस दिवसांत ११६७ जणांना कुत्र्यानं चावा घेतलाय. तर एक एप्रिलपासून तब्बल ४७४८ लोकांना कुत्रा चावलाय.
कुत्रा चावल्यानंतर देण्यात येण्याच्या लसी पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाहीत.
भटक्या कुत्र्यांचा मुद्दा नाशिक महापालिकेनं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे.... कुत्र्यांच्या बंदोबस्ताबरोबर महापालिका रुग्णालयांमध्ये लस उपलबध करुन देण्याकडे लक्ष द्यायला हवंय.