ग्रामपंचायतीकडे पैशांचा तुटवडा, महिला सरपंचाने मंगळसूत्र ठेवलं गहाण

मंगळसूत्रासह दागिने गहाण ठेवून दिलं कर्मचाऱ्यांना वेतन 

Updated: Nov 7, 2018, 06:53 PM IST
ग्रामपंचायतीकडे पैशांचा तुटवडा, महिला सरपंचाने मंगळसूत्र ठेवलं गहाण title=

किरण ताजणे, नाशिक : दिवाळीतली अशी एक सुखवार्ता जी वाचल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल. एका ग्रामपंचायतीत ऐन दिवाळीच्या तोंडावर पैशांचा तुटवडा जाणवत होता. काय करायचं, असा प्रश्न असताना सरपंच पुढे सरसावल्या आणि त्यांनी एक भारी काम केलं. 

सध्या पैशांचा तुटवडा असल्याने त्यामुळे कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं होतं. पण कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून सरपंच मोहिनी जाधव यांनी चक्क त्यांचं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि पैसे उपलब्ध करुन दिले.

मोहिनी जाधव यांनी मंगळसूत्रासह दागिने बॅंकेत गहाण ठेवत 75 हजार रुपये कर्ज घेतलं. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन दिलं आणि त्यांची दिवाळी गोड केली.

ऐन दिवाळीत सरपंचांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवले. चांगुलपणा संपला अशी ओरड ऐकायला मिळत असताना या सरपंचांनी जे केलं त्याला तोडच नाही.