नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची अखेर बदली, त्यांच्या जागी पाहा कोणाची नियुक्ती

पोलीस खात्यात मोठे फेरबदल होत आहेत. 

Updated: Apr 20, 2022, 10:27 PM IST
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची अखेर बदली, त्यांच्या जागी पाहा कोणाची नियुक्ती title=

नाशिक : नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता जयंत नाईकनवरे नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत. पोलीस खात्यात मोठे फेरबदल होत आहेत. 

महाराष्ट्र मध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पदोन्नती देतो बदल झाले आहेत नाशिकचे वादग्रस्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना साइड पोस्टिंग देत विशेष पोलीस महानिरीक्षक महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग येथे बदली करण्यात आली आहे दीपक पांडे यांनी सध्याच्या विद्यमान पदावरून बदली हवी असल्याचे यापूर्वीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विनंती अर्ज केला होता. 

सण, उत्सव, मोर्चे, कार्यक्रमांना परवानगी नाकारल्यामुळे आणि हेल्मेट सक्तीमुळे दीपक पांडे चर्चेत आले होते. दीपक पांडे यांना कदाचित बदलीची चाहूल लागली होती. त्यांनी पोलीस महासंचालकांना आधीच बदलीसाठी विनंती अर्ज पाठवला होता.  त्यामुळे बदली आता राजकीय हस्तक्षेपामुळे झाली असं चित्र उभं राहणार नाही. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आणि दीपक पांडे यांनी भोंग्यांबाबत आदेश जारी केले होते. या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. धार्मिक स्थळांनी ३ मे पर्यंत भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी, असे आदेश दीपक पांडे यांनी दिले होते.

कुठल्याही मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास मनाई करण्यात आली होती. अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावता येणार नाही. असे आदेश ही त्यांनी दिले होते.