नाशिक शहर बनले क्राईम नगरी

जुन्या वादाच्या हल्ल्यात दोन जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरु.....

Updated: Mar 19, 2023, 08:29 PM IST
नाशिक शहर बनले क्राईम नगरी title=
घटनेनंतर पोलीस घटना स्थळी दाखल

सोनू भिडे, नाशिक :- 

नाशिक शहरात आता सिनेस्टाईल हल्ला (attack ) होऊ लागले आहेत. गुन्हेगार (accuse)  एखाद्याचा पाठलाग करून हल्ला करतात तसा *दोन जणांवर गोळीबार करत कोयत्याने  हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

काय झाली घटना

संशयित आरोपी आणि त्याचे साथीदार यांच्या गाडीने (MH15 DM 7639) तपन जाधव आणि राहुल पवार यांच्या गाडीचा ( MH04 EX 5678) पाठलाग करत होते. एका जुन्या वादातून वैमनस्य असल्याने दोघांना संपविण्याचा डाव होता. सातपूरच्या औद्योगिक वसाहतीतील (MIDC) महिंद्रा कंपनी (Mahindra & Mahindra Co.) आणि कार्बन नाकाच्या दरम्यान संशयिताने तपन आणि राहुल यांच्यावर गोळीबार केला. (firing ) लक्ष्य साध्य व्हावे म्हणून कोयत्याने सुद्धा वार केला. यात तपन जाधव याला गोळी लागली तर  राहुल पवार गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात (Hospital) उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.             

असा आहे घटनाक्रम

संशयित आरोपीच्या मनात जुन्या वादाचा राग असल्याने जखमी तपन जाधव आणि राहुल पवार यांचा पाठलाग केला. यानंतर सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत आल्यानंतर महिंद्रा कंपनी पासून कार्बन नाक्या दरम्यान गाडीला (Car) धडक दिली. यानंतर संशयित आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तपन जाधव आणि राहुल पवार यांच्यावर गोळीबार केला यात तपन जाधव याला गोळी लागली असून राहुल पवारहि जखमी झाला होता. गाडीचे नुकसान (Damage) झाल्याने संशयितांनी एका दुचाकीस्वाराला अडवत त्याला बंदुकीचा (Gun) धाक दाखवला. आणि त्याची दुचाकी (Motor Cycle) घेऊन संशयित आरोपी आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. संशयितांच्या गाडीत पोलिसांना कोयता आणि मिरचीची पावडर (Red Chilly) मिळून आली आहे.

होळीच्या दिवशी सुद्धा शहरात गोळीबार

नाशिक शहरात होळी सणाच्या दिवशी पंचवटी परिसरात गोळीबार झाला होता. या हल्ल्यात एक महिला जखमी झाली होती. या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोच पुन्हा गोळीबार झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

गुन्हेगारी बनला राजकीय मुद्दा

माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहर एक क्राइम सिटी बनल्याचं अधिवेशनात उल्लेख केला होता. पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिला नसल्याने खुनाच सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप त्यांनी विधिमंडळात केला होता. नाशिक शहरात यासाठी पोलिसांचे कुमक वाढवली पाहिजे तसेच सर्व सामान्यांना सुरक्षित असेल असे शहर तयार झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. सध्या नाशिक शहरात दिवसाआड दुचाकी चोरी मंगळसूत्र चोरीच्या घटना होत आहेत. गंभीरगुन्हे आणि खुनांच प्रमाणही लक्षणीय झाल आहे. अपघातात तर नाशिक शहर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी या अपघातांमध्ये आणि विविध गंभीर हल्ल्यांमध्ये गेला आहे. वाढते गुन्हे हे नाशिककरांसाठी चिंतेची बाब बनली आहे.