नाशिक : नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला सुरूवात झालीय. शिवसेना नेते बाळासाहेब सानप यांना भाजपनं गळाला लावल्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली असून नाशिकमधील भाजपच्या दोन नेत्यांना शिवसेनेनं गळाला लावलंय. वसंत गिते आणि सुनील बागूल हे भाजप नेते हातावर बांधणार शिवबंधन बांधत आठवडाभरात शिवसेनेत प्रवेश करणारेत.
भाजपने नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. आशिष शेलार यांना नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमले आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून द्यायचे आव्हान आता आशिष शेलार यांच्यापूढे आहे. तर इतर महापालिका निवडणुकांसाठी मुख्य जबाबदारी आणि प्रभारी यांचे वाटप भाजपने निश्चित करत निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे.