नांदेडमध्ये पोलिसाची दगडाने ठेचून हत्या

नांदेडच्या दत्तनगर भागात एका पोलीस कर्मचाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

Updated: Feb 4, 2018, 07:39 PM IST
 नांदेडमध्ये पोलिसाची दगडाने ठेचून हत्या    title=

 नांदेड : नांदेडच्या दत्तनगर भागात एका पोलीस कर्मचाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या धक्कादायक प्रकारामूळे परिसरात खळबळ माजली आहे. 

वैयक्तिक कारण 

शिवाजी शिंदे असं मृत पोलिसांचं नाव असून वैयक्तिक कारणावरून हत्या करण्यात आल्याचं समोर येतंय.

आरोपी फरार 

शिवाजी शिंदे यांच्या  परिसरातलाच हा आरोपी असून हत्येनंतर हा मारेकरी फरार झालाय..पोलीस त्याचा शोध घेत आहेत.