नागपूर : शहरात 31 डिसेंबरच्या रात्री नागपूर वाहतूक पोलिसांनी 1092 वाहनधारकांवर कारवाई केली आहे. शहरात 50 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने दारु पिऊन गाड्या चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती. यात ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत 592 तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी तळीरामांची वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अनेक तळीरामांना आपली रात्रं पोलिसांसमोर चौकशी आणि कारवाईतच घालवाली लागली.
तर इतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 500 वाहनधारकांवरही कारवाई करण्यात आली आहे. ज्यांच्यावर मद्यपान करून आधी कारवाई झाली होती आणि काल पुन्हा कारवाई झाली त्यांचं लायसन्स रद्द करण्याची विनंती आर टी ओ ला करणार असल्याचं वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.